भारतातील आर्थिक विषमता: देशाच्या GDP बरोबरच नागरिकांचा GDP per Capita वाढणे अत्यंत गरजेचे

भारताची अर्थव्यवस्था हि जगात ५व्या क्रमांकावर आहे. २०२४च्या वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (२८ ट्रिलियन डॉलर) पहिल्या क्रमांकावर, चीन (१८ ट्रिलियन डॉलर) दुसऱ्या क्रमांकावर, जर्मनी (४.५ ट्रिलियन डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर, जपान (४. १ ट्रिलियन डॉलर) चौथ्या क्रमांकावर भारताच्या पुढे आहेत. आजच्या आकडेवारी नुसार भारताची अर्थव्यवस्था हि ३.९ ट्रिलियन डॉलर सह पाचव्या क्रमांकावर आहे.

भारत सरकारने २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्देश ठेवले आहे. आज सध्याला जपान व जर्मनी क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येने  भारतापेक्षा खूपच लहान असूनसुद्धा अर्थव्यवस्थेत भारतापेक्षा मोठे आहेत.

आकडेवारीनुसार जपानची लोकसंख्या १२.५ कोटी, जर्मनीची ८.६ कोटी आहे तर भारतामधील फक्त एक राज्य महाराष्ट्राचीच लोकसंख्या १३.१६ कोटी आहे. जर आपण क्षेत्रफळानुसार बघितले तर जपानचे क्षेत्रफळ 377,973 km², जर्मनीची 357,592 km² आहे तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307,713 km² आहे, जे कि जवळजवळ जपान आणि जर्मनी एवढेच आहे. आज भारतामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशाषित प्रदेश आहेत आणि काही राज्ये तर महाराष्ट्रापेक्षाही क्षेत्रफळानीही आणि लोकसंख्येनेही मोठी आहेत.

जेव्हा आपण GDP Per Capita ची आकडेवारी बघत असतो तेव्हा भारताचा क्रमांक १९५ देशामध्ये १३६व्या क्रमांकावर येतो. वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न फक्त २,४१० डॉलर (साधारणतः २ लाख १ हजार रुपये) एवढेच आहे तर हीच आकडेवारी अमेरिका ७६,३२९ डॉलर (म्हणजे ६३ लाख ७७ हजार रुपये), चीन १२,७२० डॉलर (म्हणजे १० लाख ६२ हजार रुपये), जर्मनी ४८, ७१८ डॉलर (म्हणजे ४० लाख ७० हजार रुपये), जपान ३४,०१७ डॉलर (म्हणजे २८ लाख ४२ हजार रुपये) प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आहे.

भारतामध्ये आर्थिक विषमता हि जास्त आहे. Statistica च्या रिपोर्टनुसार – भारतातील फक्त १०% टक्के श्रीमंत व्यक्तींकडे २०२२ मध्ये देशाच्या करपूर्व उत्पन्नाच्या ५७% टक्के पेक्षा जास्त संपत्ती आहे, तर तळाच्या ५०% टक्के लोकांकडे फक्त १५% टक्केच्या आसपास संपत्ती आहे. २०२३च्या अखेरीस, भारतातील सर्वात श्रीमंत १% टक्के व्यक्तींकडे देशातील ४०.१% संपत्ती होती, जी १९६१ नंतरची सर्वाधिक आहे.

जेव्हा जेव्हा युरोपिअन किंवा अमेरिकेतील नागरिकांच्या जीवनमानाबद्दल बोलले जाते, तेव्हा GDP per capita ह्या खूप महत्वाचा आहे असे दिसते. हि वरची आकडेवारी बघून जर आपल्याला भारतातील प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचवायचे असेल तर केवळ भारताची अर्थव्यवस्था फक्त ३ऱ्या क्रमांकावर जाऊन जास्त उपयोग होणार नाही तर त्याबरोबरच भारतातील प्रत्येक नागरिकांचे सरासरी उत्पन्नसुद्धा नक्कीच वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे.

भारतीय संस्कृती हि जगात आदर्श अशी असणारी संस्कृती नक्कीच आहे पण त्याच बरोबर चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे सरासरी उत्पन्न हे वाढायला पाहिजेच.

Sources https://data.worldbank.org/ , https://wid.world/wp-content/uploads/2024/03/WorldInequalityLab_WP2024_09_Income-and-Wealth-Inequality-in-India-1922-2023_Final.pdf

Leave a Reply